Monday, January 15, 2007

chitt hyanchyaa gazalaa

chitt hyanchyaa gazalaa

चांदणे
धुंद आज रात चांदणे
वाहते पुरात चांदणे

या चराचरात चांदणे
येथ फत्तरात चांदणे

किणकिणे पहाटवेळला
स्वप्नमंदिरात चांदणे

माझिया कुशीत पौर्णिमा
माझिया उरात चांदणे

चंद्रमा हळूच लाजला
कंपले स्वरात चांदणे

हिंडतोस का उन्हापरी?
ये घरी, घरात चांदणे

नववधूच चांदरात
हीपालखी, वरात चांदणे

बोलतोस तू जरी कमी,
त्या मिताक्षरात चांदणे

पाहतोस का असा सख्या?
दूर अंतरात चांदणे

chittranjan Bhat

No comments: