Wednesday, January 17, 2007

majhyaa kavitaa

YOu can view my poems here.

वेळ झाली पापण्यांनी पापण्यांशी बोलण्याची वेळ झाली
बोललो नाही कधी ते सांगण्याची वेळ झाली

जा सखे तू ,शब्द माझा मोडण्याची वेळ झाली
का हव्याशा बंधनाला तोडण्याची वेळ झाली?

वेळही झाला कितीसा डाव हा मांडून राया
एवढ्यातच हाय सारे हारण्याची वेळ झाली

सांजवेळी पाकळ्यांना मिटुन घ्या माझ्या फुलांनो
उमलले तुमच्यासवे ते विसरण्याची वेळ झाली

आसवांना वाहण्याची एकदा संधी मिळाली
तीच ती दु:खे नव्याने सोसण्याची वेळ झाली.

Sonali Joshi- Published ekata - July 06 -सोनाली जोशी

निळावतीच्या शुभ्रकळ्यांनो
निळावतीच्या, शुभ्रकळ्यांनो, अंधारा या,उजळाया
पानोपानी, बहरूनीया, ह्या विश्वाला, सजवाया
निघा सख्यांनो, लवकर साऱ्या,मला भेटण्या, प्रेमाने
शब्दांमध्ये, माझ्या फुलुनी, रहा कवितेत, स्नेहाने

पहाटपक्षी, साद घालता, दाटुनिया ये, किती मला
रात्रंदिन हा, लपाछपीचा, खेळ नकोसा, अता मला
साऱ्या हसऱ्या, ओठांवरती, जेव्हा असते, मम गाणे
आठवते मी, तेव्हा तेव्हा, सारे तुमचे, नजराणे!

निळावतीच्या, शुभ्रकळ्यांनो, घनतम सारे, प्रकाशले
धवल आपुल्या, अनुरागाने, तृप्तीलाही, सुखावले

published Rangadeep 06- sonali Joshi

प्रवासी ह्यांच्या गझला

मनोगत ह्या संकेतस्थळावर लेखन करणारे श्री. प्रवासी ह्यांच्या गझला मला मार्गदर्शनपर आहेत. त्यांच्या पूर्वपरवानगीने त्या माझ्या ब्लॉगवर ठेवते आहे.


शिदोरी

मी तुला रागवाया हवे?
तू मला दे बहाणे नवे

वाचले चारही वेद पण
राहिले दुःख हे पाचवे

का तिने तोडला बांध हा?
वाहिले ना पुन्हा कालवे!

जेवणाची घरी वानवा
अंगणी पाखरांचे थवे

काय ह्या कातड्याचे करू?
(शाहणी ज़ाहली गाढवे)

विंचरावी कशी वेदना?
कुंतली गुंतले कंगवे

भेटण्याची नवी श्रावणी
सोसण्याचे नवे ज़ानवे

'ज़ा प्रवासी सुखाने पुढे
घे शिदोरीस ही आसवे'
~ प्रवासी ७ डिसेंबर २००५ ~


कुठे आसावले कोणी कुणाच्या बासरीसाठी?
खुळी राधा जशी वृंदावनी त्या श्रीहरीसाठी

कसा आटापिटा कोणा कळावा निर्झराचा हा?
कधी का पाहिली कोणी उडी असली दरीसाठी?

तशी केली न लाचारी कधी मी नोकरीसाठी
परंतू लागते सोसावयाला भाकरीसाठी

तुला तारांगणे आकाशगंगा चांदण्या साऱ्या
मला दे चंद्र थोडासा तुझा कोजागरीसाठी

ज़गावी एक ओवी - हीच इच्छा राहिली
आहेतसे आयुष्यही कोठे पुरे ज्ञानेश्वरीसाठी?

लुटायाचे लुटोनी ज़ाहले आभाळ स्वारांचे
पुन्हा का लागले घोडे ढगांमागे सरीसाठी?

म्हणाला आरसा माझ्या कपाळी काय हे आले?
टिळा हा कुंकवाचा का रडावा कोयरीसाठी?

धुळीला दोष का द्यावा? धुळीचे काम नाही हे
!कुणाला वेळ आहे पापण्यांच्या मस्करीसाठी?

मनीचे सर्व काही बोलुनी झाले तुझ्यापाशी
अता आहेत कोठे शब्द बाकी शायरीसाठी?

'प्रवासी जन्ममृत्यूच्या पुरे वाऱ्या जिवाच्या ह्या
अता प्रस्थान कायमचे करावे पंढरीसाठी'
~ प्रवासी २२ नोव्हेंबर २००५ ~



शोध घेते नज़र का अशी वेंधळी?मी कुठे वेगळा? तू कुठे वेगळी?
पापण्यांनो ज़रा दूर घ्या ओढणीहोउदे ना दिठी मोकळी मोकळी
नेहमीसारखी गप्प ती राहिलीपण मला आज़ सामील झाली खळी
गुप्तहेरी कुणी आज़ केली अशी?भृंग भांबावला, हासली पाकळी
काय वेणीतली ती फुले बोलली?लाज़ली का अशी मोगऱ्याची कळी?
तू मला दे मुठीने मुठीने हसूमी तुला अर्पितो ओंज़ळी ओंज़ळी
का विषय काढता इंद्रियांनो असे?प्रीत माझी तिची सोवळी सोवळी
कैद करताच तू पंख फुटले मलाही कशी कोठडी? ही कशी साखळी?
हूड वाऱ्यासवे शीड हे भेटलेरात्रही वादळी ! भेटही वादळी !
आज़ ठरलो तुझाही गुन्हेगार मीन्याय देते कुठे देवता आंधळी?
मी कुठे? तू कुठे? हा कसा सोहळा?दाटली का नभी एवढी मंडळी?
'मी प्रवासी ज़री विश्व हे व्यापलेसोबतीला उरे शेवटी पोकळी'
~ प्रवासी १७ नोव्हेंबर २००५ ~


लोकशाहीचे प्रणेते बोललेलोक कोठे? फक्त नेते बोलले
हा कसा इतिहास आम्ही मानला?सत्य केंव्हा विश्वजेते बोलले?
भेटले दोघे अवेळी हे मलादैव देते कर्म नेते बोलले!
मी कुठे शब्दांत काही बोललो?(मौन जे बोलायचे ते बोलले)
हे नभोवाणीपरी का बोलणे?- 'एकदा मी बोलले ते बोलले'
जिंकल्या इतक्या लढाया पण तरी'युद्ध हरलो' का विजेते बोलले?
ओडवांचे षाडवांशी जुंपलेसूर जे जे वर्ज्य ते ते बोलले
शेवटी होऊ नये ते ज़ाहलेनेत्र हे बोलू नये ते बोलले
'का प्रवासी नेत्र हे पाणावले?फक्त मी ज़ाऊन येते बोलले'
~ प्रवासी ७ नोव्हेंबर २००५ ~




अश्रूंस ढाळण्याचा माझा स्वभाव नाहीदुःखेच माळण्याचा माझा स्वभाव नाही
दारावरी उभा मी आहेच स्वागताला शत्रूंस टाळण्याचा माझा स्वभाव नाही
देतोस काय इंद्रा आदेश मेनकेला?रूपास भाळण्याचा माझा स्वभाव नाही !
आहेत वेध आता ठिणगी बनावयाचेडोळ्यांत वाळण्याचा माझा स्वभाव नाही
अग्नीसही विचारा, तावून मी निघालोवरवर झळाळण्याचा माझा स्वभाव नाही
आहेत अंतरंगी आक्रोश दाबलेलेखोटे खळाळण्याचा माझा स्वभाव नाही
~ प्रवासी ३१ ऑक्टोबर २००५ ~




ते घर नव्हते पण घरासारखे होतेडोक्यावरती छप्परासारखे होते
नव्हताच कधी विश्वास मला ज़गण्याचापण मरणे प्रत्यंतरासारखे होते
मौनात रंगले अंक अंक इतके कीबोलणेच मध्यांतरासारखे होते
मी लढायला सीमेवर गेलो नाहीआयुष्यच हे संगरासारखे होते
माणूस आत तर तोच राहिला होतावरवरचे वेषांतरासारखे होते
मावळतो तो पण पुन्हा नव्याने येतोउत्साहाचे भास्करासारखे होते
मी भणंग पण राजाच जणू पृथ्वीचा(आभाळ छत्रचामरासारखे होते)
मी मुठीमुठीने कशी करू भरपाई?उपकार तुझे डोंगरासारखे होते
~प्रवासी २० ऑक्टोबर २००५~

किती शोधले चांदण्याचे ठसे, सापडावे कसे?अमा रोजची दाटलेली नभी, मग दिसावे कसे?
तसे आपले प्रेम होते पुराण्या मधाचे सखेदुरावा असा घट्ट पोळे जणू, पाझरावे कसे?
उभे आडवे शब्द माझे तुझे भेटले ना कधीउरे चौकटी चौकटी रिक्त, कोडे सुटावे कसे?
कधी बोललो मी न डोळ्यांस माझ्या मनीच्या व्यथातुझ्या पापण्यांना तरी लागले हे सुगावे कसे?
पुन्हा आज चालून आल्या तुझ्या आठवांच्या सरीपुन्हा एकट्याने तुझ्या आठवांशी लढावे कसे?
तशी राहिली ना अताशा मला वादळाची नशातरी राहिले मोडक्या गलबतांचे पुरावे कसे?
~~प्रवासी ५ ऑगस्ट २००५~~



तुझ्या विचारे उजाळलेली, हजार स्वप्ने मनात माझ्या...खरे परी एकही ठरेना, नसेच ते प्राक्तनात माझ्या...
तुझ्या नि माझ्या घडून भेटी, निघून गेली अनेक वर्षेतरी कळेना अजून का गे, तशीच तू स्पंदनात माझ्या...
तुझी निशाणी दिसे न कोठे, दरीत ना डोंगरात ही नाकडेकपार्‍यांत ना तरीही, सदैव तू चिंतनात माझ्या...
रजोतमाच्या सुरासुरांची, अशीच चाले सदैव क्रीडानिरामयाची सुरत्नमाला, उदेल का मंथनात माझ्या...
प्रचंड प्रासाद भव्य तूझा, तयामधे सर्व वैभवे तीसुखोपभोगात दंग तूही, कशास येशी वनात माझ्या...
'नको प्रवासी नको चिडू रे, रडू नको ओरडू नको रेतुझ्याच गोष्टी तुझीच चिंता, अबोल आक्रंदनात माझ्या...'





युगे अशी वहावली कशी?पुन्हा क्षणात मावली कशी?
जगात कोण ऊन माजलेतुझ्या कवेत सावली कशी?
अताअताच भेटली मलालगेच ती दुरावली कशी?
म्हणे न खोड काढली तिनेउगाच जीभ चावली कशी?
तनामनास जाळते व्यथामिठीमधे दगावली कशी?
पुरे पडे न विश्व पण सुखेतुझ्या मुठीत मावली कशी?
तुझ्यासमोर क्षीण स्पंदनेतुझ्याविना बळावली कशी?
नभात साठली न आसवेधरेकडेच धावली कशी?
कधीच वाळवंट संपलेतळी मला न गावली कशी?
कुठे न ती विसावती मनेस्मृतीमधे विसावली कशी?
जगायचे जगून जाहलेतृषा तरी बळावली कशी?
- प्रवासी



कोसळताना, तुला पाहिले...उभारताना, तुला पाहिले...
तगमग झाली, धरणीची अन्आसुसताना, तुला पाहिले...
मेघ येइना, निरोप घेउनआतुरताना, तुला पाहिले...
नदी आटली, कोंब फुटेनापाझरताना, तुला पाहिले...
मोह दाटला, लज्जा सुटलीबावरताना, तुला पाहिले...
आशाकांक्षा, बुडू लागल्यातरंगताना, तुला पाहिले...
सृजनशीलता, बोथट झालीखळबळताना, तुला पाहिले...
प्रौढत्वाचा, पाश आवळेबागडताना, तुला पाहिले...
कंठ दाटला, शब्द फुटेनाकुजबुजताना, तुला पाहिले...
चमकुन गेली, वीज अचानकप्रकाशताना, तुला पाहिले...
'धीर धरी रे, सख्या प्रवासी'सावरताना, तुला पाहिले...



दिसते नवे तरीही, सारे जुनेच आहे...तुझियाविना सखे हे, जीवन उणेच आहे...
चढवून गे मुखवटा, दुनियेत हिंडतो मीवदनावरी हसू अन्, हृदयात ठेच आहे...
मी शोध घेत जातो, नाठाळ पैंजणांचात्यांचे सुरेल गाणे, मज पारखेच आहे...
आकर्षणे उथळशी, येऊन खूप गेलीवाटे तुला पहाता, ते आगळेच आहे...
बोलायचे मलाही, बोलायचे तुलाहीकोणी सुरू करावे, बस हाच पेच आहे...



वेदनेशी एकट्याने, झुंजणे नाही बरे...कोवळ्याश्या कापसाला, पिंजणे नाही बरे...
वाहणार्‍या आसवांना, रोखणे नाही बरे...चातकाने पावसाला, रडवणे नाही बरे...
अंतरीच्या भावनांना, लपविशी आता कितीमोकळे करण्या मनाला, लाजणे नाही बरे...
घातल्या बेड्या तुझ्या तू, आपुल्या पायांमधेमानणे खोटेच त्यांना, पैंजणे नाही बरे...
तापले जे एककाळी, तप्त लोखंडापरीलोळुनी डबक्यात त्याने, गंजणे नाही बरे...
लागुनी झळ वास्तवाची, पोळले आधीच जेत्या मनाला अधिक आता, भाजणे नाही बरे...





मी पाहताच तिजला ती नजर जात खाली,संकोच यौवनाचा घेऊन रात आली.
हातात दुग्धपेला घेऊन आत आली,की चंद्रमा नभीचा घेऊन रात आली?
आजानु केशभारा वेणी फुलांत ल्याली,दरवळे रातराणी शिंपून रात आली.
ती माळ मौक्तिकांची ऐसी गळ्यात घाली,की चांदण्याच सार्‍या माळून रात आली?
अस्तास भास्कराच्या ती केशरात न्हाली,अन् चांदणे नभीचे लेऊन रात आली.
चर्येवरी उमटली लपवी करांत लाली,की लाजर्‍या फुलाला स्पर्शून रात आली?
पायांत पैंजणे ती गाती सुरात, ताली,हळुवार मालकंसा गाऊन रात आली.लयबद्ध पाउले ती ऐसी भरात चाली,गजगामिनीच जैसी होऊन रात आली.
'घे ना मला प्रवासी' गडबड मनात झाली,घनघोर प्रीतवर्षा बरसून रात आली...


ऐक बाई ऐक आताऐक माझी ही कथा.प्रीतिच्या त्या स्पंदनांचीभाववेडी ही व्यथा.
सांगतो आधीच मी, हीस्पंदनांची व्यर्थ गाथा.मग नको मजला म्हणू कीहा पसारा का वृथा?
कोणतासा तो ऋतू अन्कोणतीशी सांजवेळा.एकटासा मी उभा अन्पैंजणांचा सूर आला...
बघितले दचकून मी हे स्वप्न माझे सत्य का?प्रीतिचे पसरून बाहूती उभी अभिसारिका!
स्तब्ध तैसे निमिष नकळतगेले किती ना माहिती.दोन आम्ही एक झालो,मी तिचा अन् माझि ती.
नाजुका ती, लाजु का मी,गुपित तुज सांगावया?भाववेडी शब्दवेडीतीच मम कविताप्रिया.




पश्य मा अद्यऽयं दर्पणं कामिनी,प्रेमसंवादकालो च शीघ्रं सरेत्, शीघ्रं सरेत्॥धृ॥
श्वासवेगो प्रवेगोऽधुना अस्ति मे,अद्य शीघ्रानुगामी इदं मेलनम्।गुंफितायां त्वया कृष्णमेघावल्याम्तेजलोपो न तेजस्विनेऽस्याः भवेत्।हस्तआभूषणैर्हि ध्वनीं मा कुरु,लज्जमानो ऋतू यम् अलज्जो भवेत्, अलज्जो भवेत्॥१॥
रक्तयो ओष्ठयो हास्यमाकर्षकम्,पावकेऽभ्यागते बाष्पबिंद्वेर्दवम्।नेत्रयो विभ्रमैर्युक्तदृक्मोहिनी,पश्यवंतो विधाता सचिंतो भवेत्।हे अधोपश्यमाना सुहास्यानना,दर्पणो ते मुखं पश्य मूढो भवेत्, मूढो भवेत्॥२॥
ते पदन्यासआभास संमोहिनी,सूर्यतारांगणानापि सुप्तं करेत्।कोमलौ ते च पादौ यदा चुंबति,भाति शुष्कं वनं निद्रमाणम् अपि।पादशोभायुतां पश्य रंगावलिम्भूमिआलेप एषो अधीरो भवेत्, अधीरो भवेत्॥३॥
पश्य मा अद्यऽयं दर्पणं कामिनी,प्रेमसंवादकालो च शीघ्रं सरेत्, शीघ्रं सरेत्॥धृ॥


कौमुदीशोभितनिशायां स्वप्नमालां विस्मरया त्वदीया कदाचित्, मां मुग्धबालां विस्मरधृ
सूत्राणि यानि आनीतानि, तव त्वया च मम मयागुंफिता माला च तस्याः वलयबन्धं विस्मर१
वचनं च यं दत्तं मया च, मूढशपथाः अर्पिताःकेवलाः शब्दाः हि ते, अर्थां च तेषां विस्मर२
प्रेमवार्तालापरोषाः छद्मरोषा: गुञ्जनम्।हास्यं च तद् ते आसवाः, अद्य सर्वं विस्मर॥३॥
चंद्रमा साक्षी च यद्, कुसुमेभ्य यद् अवलोकितम् ।प्राणेषु यद् लिखितं मया, तद् अपि त्वं विस्मर ॥४॥



परमेशो नास्ति अचिंतयमहं सततम्एके रात्रौ नक्षत्रान् अपृच्छम्।"यूयं नित्यं विश्वे संचारन्त:,दृष्टौ चरणौ किं देवस्य कदाचित्?"
सस्मितं चंद्रिकाः अकथत मह्यं काश्चित्"नित्य प्रवासी अयं सर्वदा भ्रमतिलिखितानि तस्य तमपटले पदचिह्नानित्वं तानि पृच्छसि - अस्ति स अथवा नास्ति!"




मिले किसीसे नज़र, तो समझो ग़ज़ल हुई,रहे न अपनी खबर,तो समझो ग़ज़ल हुई
मिला के नज़रों को, वो हया से फिर*,झुका ले कोई नजर,तो समझो ग़ज़ल हुई
इधर मचल कर उन्हें, पुकारे जुनूं मेरा,भडक उठे दिल उधर, तो समझो ग़ज़ल हुई
उदास बिस्तर की सिलवटें, जब तुम्हें चुभें,न सो सको रातभर, तो समझो ग़ज़ल हुई
वो बदगुमां हो तो, शेर सूझे न शायरी,वो महर-बां हो 'जफर', तो समझो ग़ज़ल हुई
* येथे आणखी एखादा शब्द असावा
कुणा असे भेटता नयन होतसे गज़लस्वतःस विसरे भ्रमिष्ट मन होतसे गज़ल
भिडून नेत्रास नेत्र लाज़ून चूर तीकसे झुकावे तिचे वदन होतसे गज़ल
इथे जपावा तिचाच मी मंत्र सारखातिथे मनी पेटता हवन होतसे गज़ल
उदास गादीवरी तुला टोचते घडीकुठे अता रात्रभर शयन? होतसे गज़ल
रुसे जशी ती सुचे कुठे शायरी मला?प्रसन्न दिसता तिचे वदन होतसे गज़ल




रहस्यमय प्रेमाचे सुनीत
टीशर्टांकित जीन्सयुक्त ललना झाडून साऱ्याज़णीह्यांच्यामाजि मला कशी गवसली नाज़ूकशी लखनवी?गोंगाटी ज़णु चित्त शांत करण्या गाई कुणी भैरवी की ही घोर तमामधे चमकली तारांगणी चांदणी
'माझे प्रेम तुझ्यावरीच सखये' सांगू तिला मी कसा? कोठे हिंमत माझियात असली काळीज़ हे धड्धडे मागू हातच थेट का मग तिच्या ज़ाऊन बाबांकडे? छे छे! कोण कधी गुहेत शिरला वाघासमोरी ससा!
तैसे लोक मला भिडस्त म्हणती तीही तशी लाज़रीप्रेमाच्या घटनांत नाव न कधी माझे तिचे गोवती जादू काय परंतु आज़ घडली येता समोरून ती नेत्री नेत्र ज़से उगाच भिडले, ती हासली सुंदरी
हास्याचे मज़ त्या रहस्य कळले गेहास गेल्यावरी आईबाप तिचेच काल अमुच्या येऊन गेले घरी
~ प्रवासी २८ नोव्हेंबर २००५ ~




म्हणुदेत तुला ते जाडी, चिडवोत हसो वा कोणी...पण प्रेम तुझ्यावर जडले, लाडके प्रिये हे राणी !
गोबरे तुझे ते गालताकावर जणु ये लोणी..निष्पाप चेहरा ऐसाटवटवीत कुसुमावाणी..
त्या निरागसेला भुललो, सुरू झाली प्रेमकहाणी...मग प्रेम तुझ्यावर जडले, लाडके प्रिये हे राणी !
थरथरत्या शिशिरनिशेलाना शाल दिलासा देई..कुडकुडत्या थंडीमध्येकांबळे पुरे ना होई..
तव देहाची मम तनुला, उब देई दुलई सजणी...बघ प्रेम तुझ्यावर जडले, लाडके प्रिये हे राणी !
तारुण्य तुझे फुललेलेमम मिठीत मावत नाही..देऊनहि तुजला सारेवाटते राहिले काही..
सामावुन मजला घेशी, मग विशाल अंतःकरणी...बस् प्रेम तुझ्यावर जडले, लाडके प्रिये हे राणी !
§----- प्रवासी १८ फेब्रुवारी २००५ -----§



तिकडे माधुरीचे लग्न ठरले आणि इकडे तिचा चाहता असलेल्या आमच्या मराठीप्रेमी 'एकारांत' मित्राची काय अवस्था झाली ती त्याच्याच तोंडून ऐका-
दीक्षितांच्या माधुरी, भेटायला येशील का? प्रश्न माझे चार साधे, उत्तरे देशील का? ॥धृ॥
देई जो इंजेक्शने, डॉक्टर्तुला तो आवडे मी मनाचा वैद्य वेडे, मी तुला का नावडे? खास माझ्या औषधाचा डोस तू घेशील का? प्रश्न माझे चार साधे, उत्तरे देशील का?
मानले चित्पावने! 'नेने' तुला गे भावले का नको मी? मीहि तो 'लेले', 'भिडे' वा 'दामले'! घोर हा अन्याय झाला, कोणिही सोशील का? प्रश्न माझे चार साधे, उत्तरे देशील का?
दूरदेशी राहि त्याला मातृभाषा येइना म्यां मराठी पामराला अन्यभाषा येइना 'जो मराठी तोच माझा' गीत तू गाशील का? प्रश्न माझे चार साधे, उत्तरे देशील का?
ठीक आहे, शक्य नाही जाहले जन्मात या सोडली ना आस मीही, काय होते पाहुया प्राप्त आगामी तरी जन्मात तू होशील का? प्रश्न माझे चार साधे, उत्तरे देशील का?
§----- प्रवासी २१ नोव्हेंबर २००४ -----§



किती दिले सुख किती मिळाले ते न मला माहितीगतकाळाच्या भव्यस्मृतींचे कौतुक सांगू किती?
किती पहावे तुला एकटक गुंग होउनी मतीमंतरलेल्या धुंद क्षणांचे कौतुक सांगू किती?
किती फुलावे वसंत आणिक किती फुले बहरतीमोहरलेल्या चैत्रबनाचे कौतुक सांगू किती?
किती बघावी वाट तुझी मी निमिष युगे भासतीपुनर्भेटिच्या अलिंगनाचे कौतुक सांगू किती?
किती रडावे गंगायमुना डोळ्यातुनि वाहतीभडभडणार्‍या विरहाश्रूंचे कौतुक सांगू किती?
किती वहावी यौवनपुष्पे प्रेमदेवतेप्रतीहाति राहिल्या निर्माल्याचे कौतुक सांगू किती?

20/12/04


स्वप्नामध्ये, खुणावणारी, तुझी आठवण येते...झर्‍यासारखी, खळाळणारी, तुझी आठवण येते...
शुभ्र धुक्याची, शाल लपेटुन, पहाट जेव्हा, येतेतनामनाला, पेटविणारी, तुझी आठवण येते...
घरट्यामधुनी, भूप आळवित, पहाटपक्षी, उडतीप्रेमपाखरा, किलबिलणारी, तुझी आठवण येते...
क्षितिजावरती, हसते जेव्हा, शुक्रचांदणी, खुदकन्खळी गालिची, खेळविणारी, तुझी आठवण येते...
साखरझोपे, मधेच शोधत, हात बाजुला, फिरतोकोमलदेही, चेतविणारी, तुझी आठवण येते...
मंदिरातली, काकडारती, कानामध्ये, घुमतेकडकड तेव्हा, कोसळणारी, तुझी आठवण येते...
पूर्वदिशेला, अरुणाचे ते, गुलाब जेव्हा, फुलतीप्रवासीस ह्या, मोहविणारी, तुझी आठवण येते...
20/12/04





गडे चैन नाही, तुलाही मलाही...सुचेनाच काही, तुलाही मलाही...
कशी कोण जाणे अकस्मात लाटदुभंगून जाई तुलाही मलाही...
असे गाठ ही जन्मजन्मांतरीचीकळालेच नाही तुलाही मलाही...
किती यत्न केलास सोडावयाचातरी शक्य नाही तुलाही मलाही...
नको एकटे एकटे वाहणे हेभवाच्या प्रवाही तुलाही मलाही...
खुल्या होउनी आज बोलाविती यादिशा सर्व दाही तुलाही मलाही...
'कधी भेट होई? अता राहवेनाप्रवासी जराही तुलाही मलाही...'
§----- प्रवासी ३० ऑक्टोबर २००४ -----§



जगण्यात सौख्य आहे...मरण्यात सौख्य आहे...
मन पाखरू बनावेउडण्यात सौख्य आहे...
अश्रूंस अर्थ येतारडण्यात सौख्य आहे...
डोळे मिटून तुजलाबघण्यात सौख्य आहे...
तू जिंकशी म्हणोनीहरण्यात सौख्य आहे...
जाळे सुरेख ऐसेफसण्यात सौख्य आहे...
आषाढ मेघधाराभिजण्यात सौख्य आहे...
हलकेच फुंकशी तूविझण्यात सौख्य आहे...
आहेस तू तिथे मीअसण्यात सौख्य आहे...
नाहीस तू तिथे तरनसण्यात सौख्य आहे...


10/05/04



प्रांताच्या सीमेवरती सुंदरसे ते गावत्या गावाचा मानबिंदु जणु कॉलेजचे त्या नाव
प्राचार्येच्या पदा शोभती बाई विदुषी महान विद्यार्थी अन् शिक्षकांमधे त्यांना मान समान
खेळ असो वा कला असो वा असो नित्य अभ्यास विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा बाईंना एकच ध्यास
अनेक वर्षे होत राहिली कॉलेजची उन्नती आणि अचानक नजीक आली बाईंची निवृत्ती
'निरोप' देण्या त्यांना घडला 'समारोप'चा थाट बाई म्हणती शांतपणाने "कशासाठी हा घाट?"
उठला कोणी म्हणे "बाई, तुम्ही केली शिक्षणसेवा त्या कार्याचे प्रतीक म्हणुनी पुरस्कार हा घ्यावा!"
"कसले कार्य न्, कसला मजला पुरस्कार हा देता? पगार घेउनी केल्या कामा सेवा का म्हणता?"

30/11/04

© प्रवासी

Monday, January 15, 2007

chitt hyanchyaa gazalaa

chitt hyanchyaa gazalaa

चांदणे
धुंद आज रात चांदणे
वाहते पुरात चांदणे

या चराचरात चांदणे
येथ फत्तरात चांदणे

किणकिणे पहाटवेळला
स्वप्नमंदिरात चांदणे

माझिया कुशीत पौर्णिमा
माझिया उरात चांदणे

चंद्रमा हळूच लाजला
कंपले स्वरात चांदणे

हिंडतोस का उन्हापरी?
ये घरी, घरात चांदणे

नववधूच चांदरात
हीपालखी, वरात चांदणे

बोलतोस तू जरी कमी,
त्या मिताक्षरात चांदणे

पाहतोस का असा सख्या?
दूर अंतरात चांदणे

chittranjan Bhat